महाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज महाड प्रथमवर्ग दंडाधिका-यांनी जामीन मंजूर केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे मात्र दिवसभर राणे यांच्या विधानामुळे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते.
नारायण राणे यांच्यावर नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राणेंना अटक केल्यानंतर दुपारी रत्नागिरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तिथून महाड पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला. त्यानंतर राणेंना रात्री 8.30 च्या सुमारास महाड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. रत्नागिरी पोलिसांनी अटक करण्यापूर्वी राणे यांनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. महाड पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिका-यांसमोर हजर करण्यात आलं होतं. दोन्ही बाजूकडील सुनावली ऐकल्यानंतर न्यांयायालयाने राणेंना जमीन मंजूर केल्याने राणे कुटुंबीय आणि भाजप याना दिलासा मिळाला आहे