मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना आज रत्नागिरी पोलिसांनी अटक केली त्यानंतर महाड पोलिसांनी राणे यांना ताब्यात घेतले आहे
नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं. त्यानंतर राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली आहे उद्या बुधवारी राणे यांना रायगड जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान राणे यांना अटक केल्यानंतर प्रसाद लाड निलेश राणे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात आंदोलन केले राणेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सकाळपासून राज्यभरात शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर दगडफेक करीत आंदोलन केले यावेळी भाजप विरूध्द शिवसेना असा संघर्ष दिसून आला
नारायण राणे हे जेवत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली