ठाणे ; स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नियोजन भवन आवार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, ठाणे येथे रानभाज्या प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनाचे उद्घाटन नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा  पुष्पा पाटील, जिल्हा परिषद उप अध्यक्ष सुभाष पवार, ठाणे महानगरपालिकेचे  महापौर  नरेश मस्के, आमदार संजय केळकर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, ,ठाणे मनपा आयुक्त बिपिन शर्मा,अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग अंकुश माने तसेच  शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 रानभाज्या महोत्सव  ठाणे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व येऊर एन्वोरमेंटल सोसायटी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून विविध प्रकारचे रानभाज्यांचे नमुने प्रदर्शन व विक्री साठी ठेवण्यात आले होते. आदिवासी समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनावर अवलंबून आहे त्यामध्ये रानभाज्यांचे स्थान महत्वाचे आहे या करता जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींची समृद्धी हि संकल्पना अवलंबण्याचे महाराष्ट्र शासनाचे कृषि विभागाचे धोरण आहे.
 

रानभाजी  महोत्सवांमध्ये कंदभाज्या,हिरव्या भाज्या फळभाज्या, पावसाळ्याच्या सुरवातीला येतात व त्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याचे दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. या रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहचविणे आणि त्यातून आदिवासी बांधवाना उत्पनाचे स्रोत निर्माण करणे या करिता रानभाज्या प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आले होते.या प्रदर्शनास स्थानिक नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी या रानभाज्या ची पाक कला स्पर्धा ही आयोजित करण्यात आली होती. यात सुमारे ५० महिला व बचत गटांनी सहभाग घेवून विविध प्रकारच्या रानभाज्याची चव चाखण्याची संधी सर्व सामान्यांना उपलब्ध करून दिली. यावेळी  जिल्हा परिषद , कृषी विभाग व इतर  विविध विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचा महोत्सवांमध्ये उत्कृष्ठ काम केल्या बद्दल सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!