ठाणे (15) : महिलांना हक्काचे ठिकाण उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्व. धर्मवीर आनंद दिघे महिला भवनचा (समाजमंदिर) लोकार्पण सोहळा आज राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते व महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी उप महापौर. पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर, सभागृह नेते अशोक वैती, माजी महापौर व स्थानिक नगरसेविका मिनाक्षी शिंदे, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष भूषण भोईर, नगरसेविका पद्मा भगत, नगरसेवक मधुकर पावशे, ठाणे विधानसभा क्षेत्र संघटक हेमंत पवार, विभागप्रमुख राजेंद्र किसन शिंदे, महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या महिला भवनची उभारणी करण्यात आली. चितळसर मानपाडा परिसरात ग्रामपंचायत काळापासूनच शिवसेनेची सत्ता आहे, या परिसरावर स्व. आनंद दिघे साहेबांचे विशेष प्रेम होते, त्यामुळे आज त्यांच्या नावाने या परिसरात भव्य दिव्य अशी वास्तू उभारण्यास पालिकेने पुढाकार घेतला याचा आनंद होत असल्याचे असे उद्गगार एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. या परिसरातील नागरिकांना निश्चितच छोट्या मोठया कार्यक्रमासाठी या वास्तूचा उपयोग होणार आहे. तसेच प्रभागात साथीचे आजार पसरु नयेत यासाठी माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी औषध फवारणी, धूर फवारणी मशीन घेतल्या असून त्याचाही शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.