ठाणे दि. १५ : कोरानाची दुसरी लाट योग्य पध्दतीने हाताळयाने,आपण दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवू शकलो. आपण कोरोनावर मात करू शकतो असा विश्वास ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भारतीय स्वातंत्र्याचा ७४ वा वर्धापन दिन समारंभ आज ठाणे जिल्हाधिकारी प्रांगणात पार पडला. नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, जिल्हा परिषद उप अध्यक्ष सुभाष पवार, ठाणे महापौर नरेश मस्के, आमदार संजय केळकर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,,मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, ,ठाणे मनपा आयुक्त बिपिन शर्मा,अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, पोलीस आयुक्त जयजीत सिंग, पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने,सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना .शिंदे म्हणाले की,जिल्हा प्रशासन खुप चागंल्या प्रकारे काम करत आहे.कोरोनाची लढाई सर्वानी जीव धोक्यात घालून काम केले आहे.जे अधिकरी व कर्मचारी कोरोनाची लढाई लढताना शहिद झाले आहेत त्यांना सरकारनी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीसासाठी सिडको मध्ये ४५००0 घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. लॉकडाऊन मध्ये उपासमारीची वेळ आल्यामुळे ३० शिवभोजन केंद् चालू करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी पारंपारिक पध्दती सोडून नवीन आधूनिक पध्दीताचा स्वीकार केला पाहिजे. कोकणात मुसळधार पावसामुळे जी आपत्त्ती आली होती.त्याच्या मदतीसाठी ठाणे महानगरपालिका, आपत्ती प्रतिसाद दल,(TDRF) आपत्तीजन्य परिस्थितीत शोध,बचाव कार्य महत्वाचे योगदान दिले आहे.


उत्कृष्ट काम केलेल्यांना सन्मानचिन्हे
यावेळी पालंकमंत्री यांच्या हस्ते ठाणे जिल्हयात प्रशासनामध्ये उत्कृष्ठ काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी,संस्था,यांना सन्मानचिन्हे व प्रमाणपत्र सन्मानित करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,ठाणे,ठाणे महानगरपालिका,आपत्ती प्रतिसाद दल,(TDRF) आपत्तीजन्य परिस्थितीत शोध,बचाव कार्य केल्याबदल जवान,महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद,ठाणे यांचे मार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या मुली व महिलांचा ट्राफी देऊन सन्मानित करण्यात आले.महाआवास अभियान ग्रामीण मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था,व्यक्तींना जिल्हा स्तरावर महाआवास अभियान पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्यात आले.

00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *