डोंबिवली, दि.14 :. वामनदादा कर्डक हे रस्त्यावरील कवी होते.
ते खऱ्या अर्थाने लोककवी असल्याने त्यांची जन्मशताब्दी रस्त्यावर भरगच्च कार्यक्रम घेऊन साजरी करण्याचे नियोजन होते. त्याठिकाणी नंदीबैलवाले, वैदू, पोतराज, गोंधळी आदींना घेऊन शुभारंभ करायचा होता. कोरोना नियमावली आणि पावसामुळे ते शक्य नाही. मात्र ही जन्मशताब्दी देशभर पोहचवायची असून वर्षभर वामनदादांच्या साहित्याचा जागर चालवायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने जमले नाही तर ऑनलाईन पध्दतीने विविध स्वरुपाचे कार्यक्रम घेतले जाणार आहे.त्याला सगळ्यांची साथ हवी आहे असे उद्गार लोककवी वामन कर्डक जन्मशताब्दीमहोत्सव समितीचे अध्यक्ष कवी किरण येले यांनी येथे काढले.


कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात पु. ल. कट्टय़ाच्या वतीने लोककवी वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यास आजपासून सुरुवात झाली.ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते या सोहळ्याचा
शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर, कवी प्रशांत मोरे, कायद्याने वागा चळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवियत्री वृषाली विनायक यांनी केले.

महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि कवी येले यांनी सांगितेल की, मी देखील
रस्त्यावरचा कवी आहे.आणि वामनदादा हेही रस्त्यावरील कवी आहेत. त्यामुळे त्यांचा जनसामान्यांचा आवाज होता .ते रस्त्यावरील कवी होते. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची छत्रछाया लाभली होती. त्यामुळे हा माणूस आभाळा ऐवढा मोठा होता असे मत त्यांनी व्यक्त केले.
तर ज्येष्ठ कवी म्हात्रे यांनी साहित्यातही बुद्धी आणि श्रम अशी विभागणी आहे. त्यात श्रमाच्या साहित्याला फारसे महत्व दिले गेले नसले तरी वामनदादांचे साहित्य हे जनमानसात. रुजलेले आहे. शुभारंभाच्या कार्यक्रमानंतर लगेच कवी संमेलन घेण्यात आले. त्यात कवी संदेश ढगे यांनी बादशहा नावाची कविता वाचली.वामनदादांसारखे कविता करण्याचे धाडस करणे शक्य नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. घरातील विजेची बिल तरी जास्त आले तरी आपला आवाज निघत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.कवी आकाश यांनी प्रेम कविता सादर केली. कवी रमेश आव्हाड यांनी स्वातंत्र्यावरची कविता सादर केली. तर कवी अरुण म्हात्रे यांनी रानाच्या झाडातून जाते माझ्या माहेराची वाट ही हळूवार भावना टिपणारी वामनदादांची कविता सादर करुन उपस्थित सगळ्यांची वाह वाह मिळविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *