पंतप्रधान आणि संरक्षण मंत्रयांची दिवाळी जवानांसोबत
दिल्ली : देशभरात दिवाळी सण उत्साहात साजरा हेात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्यावर्षीही पंतप्रधान मोदींनी जम्मू काश्मीरच्या गुरेज येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी मोदींनी लष्करी गणवेष परिधान केला होता मोदींनी स्वत:च्या हाताने जवानांना मिठाई भरवत त्यांचे तोंड गोड केले. पंतप्रधान झाल्यापासून सीमेवर दिवाळी साजरी करण्याची परंपरा नरेंद्र मोदींना यंदाही कायम ठेवली. यापूर्वी मोदींनी २०१४ मध्ये सियाचिनमध्ये, २०१५ मध्ये पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर, २०१६ मध्ये हिमाचल प्रदेशातील चीन सीमेवरील किनौर भागात जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. निर्मला सीतारामन यांनीही संरक्षणमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच अंदमान निकोबार येथील हिंदी महासागरी बेटाला भेट दिली त्यावेळी तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यावेळी जवानांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली.