मुंबई : राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी जागतिक आदिवासी दिन साजरा केला. त्यावेळी त्यांनी आरे कॉलनीतील पाडयामधील नागरिकांसोबत आदिवासी नृत्यही केले, आदित्य ठाकरेंचा आदिवासी नृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
पंचतत्त्वांशी जवळचे नाते असणाऱ्या माझ्या आदिवासी बांधव-भगिनींना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आरे कॉलनी येथील पाड्यामधील नागरिकांसह हा दिवस साजरा करण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद आहे. येथील रहिवाशांकडून मिळणारे प्रेम भारावून टाकणारे आहे अस ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.