ठाणे : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे महापालिकेने आजपर्यंत ४,२४,३१० महिला व ३,७६,२७४ पुरुष असा एकूण ८,००,५८४ उच्चांकी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण पार केला असल्याची माहिती महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व कोवक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे. ठाणे शहरात आतापर्यंत २४,०१७ आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहिला तर १५,७७९ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंट लाइन कर्मचारी पैकी २७,२७२ लाभार्थ्यांना पहिला व १३,८२१ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला असून ४५ ते ६० वयोगटातंर्गत १,५५,४८४ लाभार्थ्यांना पहिला तर ८९,८९९ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ६० वर्षावरील नागरिकांमध्ये १,३०,४४७ लाभार्थ्यांना पहिला डोस व ७२,००५ लाभार्थ्यांना दुसरा डोस तसेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांमध्ये २,४९,३३६ लाभार्थ्यांना पहिला डोस तर २२,५२४ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दरम्यान शहरातील १२८ गर्भवती महिलांचे, १३८ तृतीय पंथाचे आणि अंथरुणाला खिळून पडलेल्या ४ व्यक्तींचे देखील कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!