ठाणे :- स्थानिक भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांवर कारवाई करू नये या मागणीसाठी अखिल भारतीय आगरी समाज परिषदेच्या शिष्टमंडळाने सोमवारी ठाणे पालिका आयुक्त बिपीन शर्मा व महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पालिका आयुकतांनी शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करून त्यांचे म्हणणे जाणून घेतले.
ठाणे महापालिका आगरी समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करत आहे का? असा सवाल करत अनधिकृत बांधकामे तोडायची असतील तर ती अधिकृत मध्ये चार- चार माळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची तोडावीत अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.आता जी बांधकामे सुरू आहेत त्यावर कारवाई न करता भविष्यात अशी बांधकामे होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिष्टमंडळाने यावेळी केली.यावेळी मंडळाचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, उपमहापौर जगदीश गायकवाड, संतोष केणे, गुलाब वझे, अर्जुन बुवा चौधरी, गंगाराम शेलार, भाजपचे रोहिदास मुंडे, दशरथ भगत, डॉक्टर राजेश मढवी, मोतीराम गोंधली आदी सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते