मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोना संकटामुळे हाहाकार माजवला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवस्थाही कोलमडली असून सर्वसामान्यांना जगणेही कठीण झाले आहे. त्यामुळे या सर्व संकटावर नियंत्रण आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना आणि बुद्ध आंबेडकरांचे धर्मनिरपेक्ष विचार व विपश्यना धम्म मार्गाच्या अंमलबजावणी करण्यासह अन्य विविध मागण्यांसाठी आझाद मैदान अथवा नवी दिल्ली येथे लोकसभा भवनासमोर उपोषण करण्याचा इशारा मागासवर्गीय स्वतंत्र मतदार संघ संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. 
       
 कोरोनामुळे सर्वसामान्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे संचारबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात यावेत, दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निमिर्ती करण्यात यावी,  बुद्धगयांचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, भारताच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भासहीत छोट्या राज्यांची निमिर्ती करण्यात यावी, सर्व सफाई कामगारांना मोफत घरकुल द्यावे, झोपडपट्टी पुनवर्सन योजनेला स्वतंत्र कायदा करणे या योजनेबाबत पूर्वीपासून कार्य करणाऱ्या संस्थेना त्वरित न्याय द्यावा, मागासवर्गीयांचा निधी पूर्णपणे त्यांच्या विकासासाठी खर्च करावा, यासह विविध मागण्यांसाठी समितीच्या वतीने संघटनाप्रमुख सुरेश गायकवाड यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद याच्यासह राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी भेटीची वेळही मागितली असून मागण्यांची त्वरित पूर्तता करण्यात यावी, असे साकडे संबंधित यंत्रणांना घातले आहे.

( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram,  Twitter, Linkdin आणि  YouTube  वर नक्की फॉलो करा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!