सदाभाऊ खोत यांचा १५ ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा


मुंबई ; राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ३१ जुलै च्या अगोदर  राज्यातील MPSC च्या सर्व जागा भरून, रखडलेल्या नियुक्त्या  आणि MPSC  आयोगावरील  सदस्यांच्या नियुक्त्या तातडीने केल्या जातील असे आश्वासन विधानसभा व विधानपरिषदत   सभागृहाला देण्यात आले होते. परंतु हा शब्द महाविकास आघाडी सरकारच्यावतीने पाळला गेला नाही. * खोट बोल पण रेटून बोल, अशा पद्धतीचा कारभार या राज्यातल्या सरकारचा चालला आहे.त्यामुळे  स्वप्नील लोणकर सारख्या आत्महत्याची सरकार वाट पाहतय ? असा सवाल रयत संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारला विचारला असून, येत्या १० दिवसात कोणताही निर्णय न झाल्यास १५ ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा खोत यांनी दिला आहे.


सदाभाऊ खोत म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार खऱ्या अर्थाने जनतेचा विश्वासघात करणारे सरकार आहे. परंतु आम्ही या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. *१५ ऑगस्ट पर्यंत MPSC* च्या परीक्षा जाहीर केल्या नाहीत व ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत, अशांना नियुक्ती पत्र दिले नाही व आयोगावरील सदस्य नेमले नाहीत तर १५ ऑगस्ट पासून  महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यातील विद्यार्थ्यांना घेऊनराज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा खोत यांनी दिला आहे.

( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram,  Twitter, Linkdin आणि  YouTube  वर नक्की फॉलो करा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!