कल्याण– कल्याण बिर्ला कॉलेज शिवसेना शाखा आणि रवी पाटील फाऊंडेशनच्या वतीने कोकणातील पूर ग्रस्तांना मदत दिली जाणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू असून, मदतीचा एक ट्रक सोमवार २ ऑगस्ट ला कल्याणमधून कोकणाच्या दिशेने रवाना केला जाणार असल्याची माहिती शिवेसना उपशहर प्रमुख आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली आहे.

कोकणातील पूराच्या संकटात अनेकांचे संसार पाण्याखाली बुडाले. त्यांना जीवनाश्यक वस्तूंची गरज आहे. त्याकरीता बिर्ला कॉलेश शिवसेना शाखा आणि रवि पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने 21 जीवनाश्यक वस्तूंचे किट तयार करण्यात आले आहे. त्यासाठी अनिरुद्ध पाटील, स्वप्नील भोंबडे, भावेश पाटील, राम मुसळे, सौरभ आरोटे, निलेश मोरे, संकेत पाटील, दिलीप सातारकर आदी पदाधिका:यांनी यासाठी मेहनत घेतली आहे. मदत साहित्यात रेशन कीट, कपडे, औषधे आदी साहित्य पाठविले जाणार आहे. कल्याणच्या शहर शाखेतून उद्या सकाळी सात वाजता मदतीचा ट्रक कोकणात रवाना केला जाणार आहे. हे साहित्य जवळपास 500 गरजूंना दिले जाणार आहे. महाड, खेड, पोलादपूर आणि चिपळूण येथील गरजूंनी ही मदत त्याठिकाणचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *