एसटी संपातील वाहकाचा मृत्यू हा सरकारच्या दडपशाहीचा बळी :
राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यातील वाहक एकनाथ वाकचौरे यांचा मृत्यू हा सरकारच्या दडपशाहीने घेतलेला बळी असल्याची संतप्त प्रतिक्रया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी एसटी कर्मचा- यांचा दोन दिवस संप सुरू आहे. अकोले बस स्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन चालू असताना वाकचोरे यांना ह्दयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय या घटनेमुळे कर्मचा-यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.
सरकारने आंदोलनावर सामोपचाराने तोडगा काढून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेत प्रवाशांना दिलासा मिळवून द्यायला हवा होता.पण त्याऐवजी परिवहन मंत्री कर्मचाऱ्यांना जेलमध्ये डांबण्याच्या व निलंबित करण्याच्या धमक्या देत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हाताळण्यात राज्य सरकार आणि परिवहन मंत्री अपयशी ठरले आहेत असा आरोपही विखे पाटील यांनी केलाआहे. एसटी कर्मचा- यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांना दिवाळीला घरी जाण्यासाठी खासगी वाहनांचे अव्वाच्या सव्वा भाडे मोजावे लागत आहे. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून परिवहन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी विखे पाटील यांनी केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!