मोबाईलमुळे उलगडला प्रकार ; १० आरोपी गजाआड :
डोंबिवली रेल्वे पोलिसांनी लावला गुन्हयाचा छडा

डोंबिवली  :    प्रेम प्रकरणातून मुलीच्या नातेवाईकांनी प्रियकराला धावत्या लोकलमधून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार एक महिन्यानंतर पोलीस तपासात उजेडात आलीय. याप्रकणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी  तब्बल १०  जणांना अटक केली असून अन्य एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आलीय.

१९ जून..रात्री ११ ची वेळ… कोपर ते दिवा रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रूळालगत साहिल हाश्मी हा तरुणजखमी अवस्थेत आढळून आला .प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचा पोलिसांकडून  अंदाज वर्तवण्यात येत होता .जखमी साहिलला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपासाची चक्रे सुरू केल्यानंतर नवनवीन माहिती उजेडात आली.  साहिलच्या मोबाईलमुळे या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. 


कशी घडली घटना ..


उत्तर प्रदेशातील भदोई येथे राहणारा साहिल हाश्मी हा तरुण अल्पवयीन प्रेयसीसमवेत १५ जून रोजी पळून गेला होता . १८ जून रोजी तो रत्नागिरी एक्स्प्रेसने मुंबईकडे निघाला. हि गाडी १९ जून रोजी रात्री १० वाजता कल्याण स्थानकात पोहचली.  सदर अल्पवयीन तरुणी  साहिलबरोबर पळून गेल्याची कुणकुण तिच्या वडिलांना लागली .याबाबत त्यांनी तिच्या अंबरनाथ मधील  भावाला याची माहिती दिली यानंतर तिच्या भावाने आपल्या गावातील कामानिमित्त मुंबईला असणार्या इतर नातेवाईक आणि मित्रांना बोलावून घेत कल्याण स्थानक गाठले. मेल कल्याणात पोचताच या सर्व आरोपींनी गाडीत प्रवेश करत या दोघांना शोधून काढले आणि साहिलला बेदम मारहाण करून कोपर ते दिवा दरम्यान चालत्या गाडीतून ढकलून दिले होते. झालेली बेदम मारहाण आणि चालत्या गाडीतून पडल्याने झालेल्या गंभीर दुखापतीमुळे साहिलचा मृत्यू झाला. पोलिसांच्या चौकशीत ही माहिती उघडकीस आलीय.  याप्रकरणी पोलिसांनी तरुणीचे वडील शब्बीर हाश्मी याच्यासह भाऊ कासीम हाश्मी , गुलाम हाश्मी, यांच्यासह  10  जणांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे तर  एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आलीय अशी माहिती. डोंबिवली जी आर पी ;वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली. –

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!