मुंबई : देश आज कारगिल विजय दिवसाचा २२ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. आजच्या दिवशी पाकिस्तानला पराभूत करणार्‍या भारताच्या रणक्षेत्रांचा इतिहास आठवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, आज कारगिल दिनानिमित्त आम्ही देशासाठी प्राण देणा-या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहतो.

२६ जुलै १९९९ हा कारगील विजय दिन म्हणून साजरा केला जातो भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला धुळीस मिळवून आपल्या सैनिकांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला याचा सार्थ अभिमान सर्व भारतीयांना आहे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी आपल्या सरकारने पाकिस्तान सरकारला मान खाली घालण्यास भाग पाडले त्या कारगिल युद्धामध्ये आपले बरेच जवान शहीद झाले अनेक भारतीयांना प्राण गमवावे लागले परंतु एक इंच ही मागे न हटता पाकिस्तानला आणि पाकिस्तानी घुसखोरांना यमसदनी धाडून पाकिस्तानचे मनसुबे उध्वस्त केले त्या सर्व देशातील शहिदांना मनपूर्वक मानवंदना करण्यात आली.

डोंबिवलीत डॉ विनयकुमार सचान स्मारकाजवळ शहिदांना मानवंदना

कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाच्यावर्षीही भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने डोंबिवली येथील डॉक्टर विनय कुमार सचान यांच्या स्मारकाजवळ पुष्प अर्पण करून शहिदांना मानवंदना दिली. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, कल्याण जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा चौधरी, पुनम पाटील, मनिषा केळकर नगरसेवक राहुल दामले, विशू पेडणेकर, निलेश म्हात्रे, विनोद कालन, संदीप पुराणिक, खुशबू चौधरी, प्रमिला चौधरी, पदाधिकारी संजू बिडवाडकर , संजय कुलकर्णी सुरेश पुराणिक युवा मोर्चाचे अध्यक्ष मितेश पेणकर आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram,  Twitter, Likdin आणि  YouTube  वर नक्की फॉलो करा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!