महाड : अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून संपूर्ण गावच दरडीखाली दाबलं गेलय गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास ही र्दुदैवी घटना घडली. कालपर्यंत डोंगराच्या कुशीत असलेले हे गाव मातीचा ढिगारा बनला आहे सर्वत्र चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं आहे. सध्या या परिसरात बचावकार्य सुरू असून मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

तळये गावात ४० ते ४५ घरे होती मात्र मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने ३५ घरे ढिगा-याखाली दाबली गेली. यामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही ८० लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. संपूर्ण गावाp ढिगा-याखाली गेल्याने क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. अनेकांचा संसार मातीमोल झाला. अनेकांनी ढिगा-याखालीच आपला श्वास सोडला. महाड तालुक्यातील तळीये गावात सकाळी एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्याला सुरुवात झाली. आतापर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखालून ३८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी ३० ते ४० जण या ठिकाणी अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पूरपरिस्थितीमुळे सर्व रस्ते बंद असल्याने बचावकार्य सुरु करण्यात आले नव्हते. आज सकाळी पूराचे पाणी ओसरायला लागल्यानंतर लगेचच या ठिकाणी स्थानिकांच्या व एनडीआरएफच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले. तसेच पोलादपुरातील सुतारवाडी गावात दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram,  Twitter, Likdin आणि  YouTube  वर नक्की फॉलो करा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!