मुंबई, ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, बदलापूर टिटवाळा आणि ग्रामीण परिसर या सर्वच भागांत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पहायला मिळत आहे. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीजवळील अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. कानवे नदीवरील पुल शेणवे ते किन्हवली. पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
कसारा घाटात बुधवारी रात्री दरड कोसळली. यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला. त्यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरड कोसळल्याने ट्रॅकवर पडलेली माती काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. हवामान खात्यानं आज मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.
——–