बळीराजाला सरकारकडून दिवाळी भेट

आजपासून कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा होणार

मुंबई  ( संतोष गायकवाड ) : राज्यसरकारने शेतक- यांची कर्जमाफीची घोषणा केली होती दिवाळीच्या मुहूर्तावर आजपासून कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेतक-यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे बळीराजाला सरकारकडून दिवाळी भेट मिळाली आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्रयाच्या हस्ते कर्जमाफीच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सुभाष देशमुख आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, आजचा दिवस हा ऐतिहासीक आहे. शेतक-यांना यापूर्वीही कर्जमाफी देण्यात आली आहे. मात्र आम्ही गुंतवणुकीही करत असल्यामुळे शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्रयानी सांगितले. शेतीच्या विकास दरातही १२ ते १२.५ टक्के इतकी वाढ झाली आहे. १५ नोव्हेंबरपूर्वी कर्जमाफी पूर्ण करणार असल्याचेही मुख्यमंत्रयानी स्पष्ट केलं. अर्थमंत्री सुधीर मुणगंटीवर म्हणाले की, हे सरकार शेतक-यांचे सरकार आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतक-याचा आहे. जगाचा पोशिंदा जगला पाहिजे. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयासाठी सामाजिक न्याय विभागाचा एकही पैसा वळवला नाही काही लोकांनी संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकरी कर्जमाफीवर राजकारण नको असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शेतक- याला कर्जमुक्त ठेवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना महत्वाची आहे. निवडणुका जवळ नसताना आम्ही कर्जमुक्ती केलीय. काँग्रसच्या ताब्यात असलेल्या दोन राज्यांनी किती कर्जमाफी केली ते ही बघा. राज्य कर्जबाजारी होतय याचाही विचार करायला हवा असेही ते म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!