डोंबिवली :  मालकी हक्काच्या जमिनीतून केडीएमसीची पाण्याची पाईप लाईन टाकल्याचा प्रकार आयरेगाव परिसरात घडला आहे. कोणतीही परवानगी न घेता जबदरस्तीने हे काम सुरू करण्यात आल्याने स्थानिक शेतकरी धनाजी केणे यांनी हरकत घेऊल हे काम थांबविले आहे. या प्रकरणी केणे यांनी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार अर्ज केला असून, डिपी रस्ता असताना खासगी जागेतून पाईप लाईन टाकण्याचा हेतू काय ? असा सवाल उपस्थित केला आहे. 

स्थानिक शेतकरी धनाजी केणे यांनी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार अर्ज केला आहे. त्या अर्जात त्यांनी म्हटले आहे की,  मौजे आयरे सर्व्हे नंबर ७/१ व २७/४ या माझया मालकी हक्काच्या मिळकतीत पालिकेकडून कोणतीही परवानगी न घेता स्थानिक माजी नगरसेवक मंदार टावरे हे जबरदस्तीने जेसीबी घेऊन जमिनीत खोदकाम करून पाण्याची पाईप लाईन टाकत हेाते. हि माहिती मिळताच मी स्वत: जागेवर त्या ठिकाणी जाऊन मालकी हक्काच्या जागेत कोणतीही परवानगी न घेता खोदकाम केल्याप्रकरणी हरकत घेतली त्यावेळी टावरे यांनी सहकार्य न करता पालिकेत स्वत: माहिती घ्या अशी उध्दट भाषा वापरली.  आमची एकमेव जागा असून त्यावर आमचा उदरनिर्वाह अवलंबून आहे भविष्यात विकास करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागू शकते तसेच डीपी रस्ता असतानाही खाजगी जागेतून पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा हेतू काय याबाबत आमच्या मनात संशय निर्माण हेात आहे त्यामुळे या कामावर हरकत असल्याचे केणे यांनी पत्रात म्हटले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *