कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने पून्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरलं आहे गेल्या आठ दिवसात कल्याण डेांबिवलीत सुमारे एक हजारापेक्षा अधिक रूग्णांची नोंद झाली असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे पालिका प्रशासनही कामाला लागले आहे एकिकडे राजकारण्याच्या लग्न सोहळयांकडे कानाडोळा करणारी प्रशासकीय यंत्रणा मात्र सर्वसामान्यांवर कारवाई करताना दिसत आहे त्यामुळे प्रशासनाचा दिखावूपणा उजेडात येत आहे

डिसेंबर जानेवारी महिन्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली होती पालिका प्रशासनाने केलेल्या उपाय योजनांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं होतं मात्र फेब्रुवारीपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत पून्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे १७ फेब्रुवारीपासून शंभरच्या पुढे रूग्ण आढळून येत आहेत २४ फेब्रुवारीला १६५ रूग्णांची नोंद झाली आहे रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याने पालिका प्रशासनाकडून पून्हा एकदा मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग वापर न केल्यास पालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे मात्र राजकीय पक्षांच्या लग्न सोहळयांकडे पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून कानाडोळा केला जात असल्याचे दिसून येत आहे

रविवारी कल्याण पूर्वेतील एका लग्न सोहळयात हजारो लोक सहभागी झाले होते मात्र लग्न सोहळाकडे पालिका प्रशासन आणि पोलीसांची डोळेझाक हा चर्चेचा विषय झाला आहे यापूर्वीही डेांबिवलीतील हळदी समारंभात कोरोना रूग्णांची हजेरीमुळे रूग्ण संख्या वाढ झाली हेाती त्याचा प्रशासनाला विसर पडला का ? त्यामुळे सर्वसामान्यांवर कारवाई करून प्रशासन केवळ दिखावूपणाची कारवाई केली जात असल्याची टीका कल्याण डोंबिवलीकरांकडून केली जात आहे.

दिनांक। रुग्ण मृत्यू

17 फेब्रुवारी – 128 ..1 मृत्यू

18 फेब्रुवारी – 132 ..1 मृत्यू

19 फेब्रुवारी – 145 ..3 मृत्यू

20 फेब्रुवारी – 147 . 2 मृत्यू

21 फेब्रुवारी – 147 …1 मृत्यू

22 फेब्रुवारी – 132 ….1 मृत्यू

23 फेब्रुवारी -102 …1 मृत्यू

24 फेब्रुवारी – 165 ….2 मृत्यू


citizenjournalist4.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *