रिपाइंच्या रोजगार उद्योग निर्माण समितीची स्थापना
तरूणांसाठी प्रत्येक जिल्हयात मार्गदर्शन शिबीर
पुणे : तरूणांना रोजगार उद्योग व्यवसायाचे मार्गदर्शन मिळावे या हेतूने प्रत्येक जिल्हयात मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार रोजगार उद्योग निर्माण समिती तयार करण्यात आलेली असून, प्रत्येक जिल्हयात ही समिती काम करणार आहे. ज्यांना या समितीत काम करण्याची इच्छा आहे. त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष व रिपाइंचे पुणे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांनी केले आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच लोणावळा येथे राज्यस्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्यानेच प्रत्येक जिल्हयात तरूणांना रेाजगारासाठी शिबीर आयोजित करावेत अशा सुचना आल्या आहेत. त्यानुसारच रोजगार उद्योग निर्माण समिती तयार करण्यात आल्याची माहिती वाघमारे यांनी दिली.
कसे असेल समितीचे कार्य
१) रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनुसार रोजगार उद्योग निर्माण समिती कार्य करेल
२) रोजगार उद्योग निर्माण समितीच्या वतीने जिल्हास्तरावर रोजगार उद्योग व्यवसाय मार्गदर्शन शिबिर व मेळावे घेऊन समाजातील सर्व जाती धर्माच्या घटकांना आर्थिक सहकार्य व रोजगार मिळवून देईल ही प्रक्रिया पूर्णत: विनामूल्य असणार आहे.
३) रोजगार उद्योग निर्माण समिती संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष व राज्य प्रतिनिधी मंडळ तयार करणार आहेत ज्यांना ह्या समिती मध्ये कांम करण्याची इच्छा असेल त्यांनी त्या जिल्ह्याचे RPI चे अध्यक्ष राज्य कार्यकारिणी च्या पदाधिकाऱ्यांचे शिफारस पत्र अर्जा सोबत जोडावे अर्ज खलील पत्यावर पाठवावेत.
कुठे कराल संपर्क
30,यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल पंडित नेहरू रोड दीक्षाभूमी लोणावळा ता.मावळ जि. पुणे