ठाणे : ठाणे शहर विभाग काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल भगत यांना खंडणीसाठी धमकावले जात असून जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात असल्याने भगत यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे धाव घेतली आहे. अनिल भगत हे  माजी आमदार स्वर्गीय बी के भगत यांचे सुपूत्र आहेत.  काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन खंडणीखोरांवर कारवाईची मागणी केली आहे. 

मुंब्रा येथे राहणारे अनिल भगत यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. तसेच काँग्रेसचे पदाधिकारी असल्याने सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. काही दिवसांपासून त्यांना खंडणी दे अन्यथा जीवे ठार मारू अशा धमकीचे फोन येत आहेत. दररोज रात्री २० ते  २५ फोन येतात. तसेच खडंणीची मागणी करणारा  रऊफ अब्दूल मनी मेमन असे नाव सांगत आहे. ५० हजार ते २५ लाखापर्यंत खंडणीची मागणी केली जात आहे. अन्यथा माझयासह कुटूंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात आहे. बुधवारी संध्याकाळी ठाणे येथील काँग्रेस कार्यालयात मिटींगला जाण्यासाठी घराबाहेर पडलो असता तिघांनी मला कंपाऊंडमध्ये अडवले. मला पैॅसे दे अन्यथा तुला ठार मारेन अशी धमकी देऊन निघून गेले. हा प्रकार घडला त्यावेळी माझा मुलगा आणि दोन कार्यकर्ते सोबत होते.  या प्रकारामुळे  कुटूंबियांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे असे भगत यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे

.—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!