पालघर : काँग्रेस च्या प्रदेश अध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती झाल्याने कॉग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश वाढला आहे. पटोले हे रविवारी पालघरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कॉग्रेसचे प्रदेश सचिव आणि पालघरचे प्रभारी संतोष केणे यांनी पटोले यांना  महाराष्ट्रात चे लाडके दैवत विठुरायाची मूर्ती भेट देऊन त्यांचे स्वागत केले. व पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.

पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथे पत्रकारांच्या संमेलनासाठी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावली होती. पालघर जिल्ह्यात प्रदेश अध्यक्षांचे  प्रथमच आगमन होत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. पालघरचे निरीक्षक संतोष केणे यांनी पालघरच्या वेशीवर पटोले यांना विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन यांचे स्वागत केले. पालघरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर  पटोले हे खासगी कामानिमित्त कल्याणला आले. यावेळी  ठाणे आणि पालघर जिल्ह्यात कॉग्रेस बळकट करण्यासंदर्भात पटोले यांनी केणे यांच्याशी चर्चा केली. कॉग्रेस मजबूत करण्यासाठी पूर्ण सहकार्य आणि ताकद कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी करण्याचे आश्वासन पटोले यांनी यावेळी दिले. १२ फेब्रुवारीला नाना पटोले हे प्रदेश अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. एक आक्रमक नेतृत्व म्हणून नाना ची ओळख असल्याने राज्यात कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे.

 ————–
स्थानिक कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतल्यानंतरच  आघाडीचा निर्णय ; पटोले 

एकीकडे कॉग्रेसचे काही नेते आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा देत आहेत मात्र नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले यांनी सावध पवित्र घेतलाय. निवडणूका स्वबळावर लढवण्याबाबत प्रसिद्धी माध्यमांनी विचारले असता नाना पटोले म्हणाले की,  आज याबाबत काही बोलणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतल्यानंतरच  आघाडी केलय जातील. त्यावेळेची काय परिस्थिती असेल त्या आधारावर निर्णय घेतले जातील असं त्यांनी स्पस्ट केलं

—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!