ज्येष्ठ नेते शरद पवार, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

मुंबई, दि. २३ : फोर्ट येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात आज हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री . उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात पार पडले.
यावेळ रश्मी ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, , अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उद्योग मंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, मुंबई आयुक्त इक्बालसिंह चहल, , अमित ठाकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. पुतळ्याचे शिल्पकार शशिकांत वडके, वास्तुविशारद रोहन चव्हाण, सल्लागार भुपाल रामनाथकर, अभियंता प्रदीप ठाकरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
शिवसेनाप्रमुखांच्या या पुतळ्याची उभारणी प्रबोधन प्रकाशनच्या वतीने करण्यात आली आहे. पुतळा ९ फूट उंच असून बाराशे किलो ब्राँझपासून बनविण्यात आला आहे. पुतळा दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर बसविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!