डोंबिवली : मार्गशीष गुरूवारच्या निमित्ताने शिवसेनेच्यावतीने डोंबिवलीत अवघ्या एक रूपयात भाजी वाटप करण्यात आली. तब्बल सहा हजार किलो भाजी एक रूपये किलो ने देण्यात आल्याने गृहिणींना दिलासा मिळाला.
डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्र नगर परिसरात शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ समाजसेवक गोरखनाथ ( बाळा) म्हात्रे, युवा सेना उपशहर अधिकारी अनमोल म्हात्रे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. एक रूपया किलो ने भाजी मिळत असल्याने महिलांची गर्दी उसळली होती. कोबी, प्लॉवर, वांगी, मटार अशी ताजी भाजी एक रूपया किलो ने मिळाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले. एकिकडे लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारी वाढली आहे अनेकांना नोक-या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली आहे तर दुसरीकडे भाज्यांचे भावही वाढले आहेत त्यामुळे एक रूपयात भाजी देण्याचा उपक्रम राबविल्याचे बाळा म्हात्रे यांनी सांगितले. शेतक-यांकडून ही भाजी खरेदी करण्यात आली आहे. कोणताही प्रसंग असाे अडीअडचीच्या कठीण समयी शिवसेना नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभी राहते आणि सदैव राहिली असे बाळा म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी सेनेचे पदाधिकारी संदीप सामंत, मनोज वैद्य, राजकुमार म्हात्रे, विजय भोईर, राम म्हात्रे, अवि मानकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वांनीच स्वागत केले
[…] […]