ठाणे : ठाणे जिल्हयात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्हयात सहा तालुक्यातील ग्रामपंचायतीत ४१८ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक होणा-या ग्रामपंचायतींची संख्या १४३ आहे. २२३१ उमेदवार हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुक प्रचाराला वेग आला आहे.
ठाणे जिल्हयात ४३१ ग्रामपंचायती असून त्यापैकी एप्रिल ते डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या १५८ ग्रामपंचायतीच्या १ हजार ४७५ सदस्यांसाठी हि निवडणूक घोषित करण्यात आली होती. १५ जानेवारीला मतदान होणार असून, १८ जानेवारीला मतमोजणी पार पाडणार आहे. जिल्हयातील ठाणे, कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि अंबनाथ या तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुक होत आहे. जिल्हयातील सहा ग्रामपंचायतीतील ५३६ प्रभागातील १४७२ सदस्यांसाठी ४२२० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील १५४६ उमेदवारांनी माघार घेतली. ९९४ जागांच्या २२३१ उमेदवारांसाठी मतदान होणार आहे.
ठाणे तालुक्यात ५ ग्रामपंचायती ५१ सदस्यांपैकी एकही बिनविरोध झालेली नाही. कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीत २११ सदस्यांपैकी ४४ जागा बिनविरोध झाल्याने १६७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. अंबरनाथ तालुक्यात २७ ग्रामपंचायतीत २४७ सदस्य संख्या असून ६९ बिनविरोध झाल्या आहेत त्यामुळे १७२ जागांवर मतदान होणार आहे भिवंडीत ५६ ग्रामपंचायतीत ५७४ सदस्य आहेत १०८ बिनविरोध झाल्याने ४६३ जागांवर मतदान होणार आहे मुरबाडमध्ये ४४ ग्रामपंचायतीत ३३८ सदस्य आहेत १७८ जागा बिनविरोध झाल्याने १६० जागांवर मतदान होणार आहे शहापूरमध्ये ५ ग्रामपंचायतीत ५१ सदस्य आहेत १९ जागा बिनविरोध झाल्याने ३२ जागांवर निवडणूक होणार आहे,