कल्याण/ प्रतिनिधी : 3 डिसेंबरच्या जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधत जनसेवा संघटना आणि दिव्यांग विकास महासंघातर्फे दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव साहित्य वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना सर्वतोपरी मदतीसाठी जनसेवा संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेने दिव्यांग विकास महासंघाच्या माध्यमातून 60 दिव्यांग बांधवांना जयपूर फूटसह विविध कृत्रिम अवयवांचे यावेळी मोफत वाटप केले. यावेळी वाटप करण्यात आलेल्या दिव्यांग बांधवांच्या कृत्रिम अवयवांचे गेल्या आठवड्यात मोजमाप घेण्यात आले होते. कल्याण परिमंडळचे डीसीपी विवेक पानसरे, वरिष्ठ पत्रकार मंदार फणसे, जनसेवा संघटनेचे प्रमूख महेश तपासे, दिव्यांग विकास महासंघाचे अशोक भोईर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हे कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले. समाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांसाठी काही तरी मदत करण्याच्या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आयोजित केल्याचे आयोजक महेश तपासे यांनी सांगितले.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *