मुंबई/ प्रतिनिधी : शिवसेना प्रणित बँक कर्मचारी सेना महासंघ आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्यात बँकिंग उद्योग पातळीवर कर्मचारी वेतन व सेवाशर्तीविषयी ११ वा द्विपक्षीय करार संपन्न झाला. महासंघाच्या वतीने करारावर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, महासंघाचे सरचिटणीस विलास घुगरे, उपसरचिटणीस विनोद निकम यांच्यासह प्रमुख पदाधिकारयांनी सह्या केल्या. हा करार दि. १ नोव्हेंबर,२०१७ पासून पाच वर्षांसाठी लागू राहणार आहे.
काय आहे कराराची वैशिष्टे ……
१ एकूण पगारात १५ टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे बँकांच्या कर्मचारयांच्या पगारावर होणाऱ्या खर्चात वार्षिक ₹ ३३८५ कोटीची वाढ होणार आहे.
२ वेतनश्रेणी नुसार वीस वर्षांत अधिकतम पातळीवर पोहचल्यावर दर दोन वर्षांनी एक प्रमाणे ९ अधिक पगारवाढी.
३ भारतात सर्वत्र एकाच दराने घरभाडे भत्ता.
४ प्रवास भत्त्यावरही महागाई भत्ता.
५ बँकेच्या कार्यमूल्य मापनावर आधारित प्रोत्साहन योजना. (Performance Linked Incentive Scheme)——————
महासंघाचे सरचिटणीस विलास घोगरे खासदार अनिल देसाई यांच्या प्रयत्नामुळे कर्मचा-यांना वेतनात जास्तीत जास्त वाढ मिळाली आहे. यामध्ये पेन्शनर यांचाही अधिक फायदा होणार आहे. भवितव्याचा विचार करून केलेला हा करार आहे. व्यवस्थापनाने इतकी मोठी वाढ दिल्याने कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ( सुभाष महाजन, अध्यक्ष स्टेट बँक कर्मचारी सेना )