कल्याण / प्रतिनिधी :- कोरोना रूग्णांची संकटाची झळ सर्वच क्षेत्राला सहन करावी लागली असताना त्यातून रियल इस्टेट क्षेत्रही सुध्दा सुटलेले नाही. बिल्डर लॉबीला मोठया प्रमाणात फटका बसला आहे. कोरोनाच्या काळात गर्दी टाळण्यासाठी ग्राहक वर्गाला आँनलाईनच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली क्षेत्रातील घरांची माहिती घरी बसुन घेता यावी तसेच त्यांच्या घराचे स्वप्न पुर्तीसाठी निवड करता यावी यासाठी एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिट तर्फे आँनलाईन माध्यमातून mymchi.com नावाने नविन पोर्टल ९ नोव्हेंबर २०२० पासून सुरू होत असून, प्रसिध्द बाधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांचे हस्ते पोर्टलचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी आयुक्त डाँ. विजय सूर्यवंशी, महापौर विनिता राणे, दिपक गरोडिया, राजन बांदेलकर, बमन इराणी उपस्थित राहणार आहेत. अशी माहितीी एमसीएचआय अध्यक्ष श्रीकांत शितोळे, माजी अध्यक्ष रवि पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोवीड-१९ च्या प्रसारामुळे घर खरेदी करण्यासाठी वैयक्तीक भेट देऊन खरेदी करणे अशक्य असल्यामुळे सदर पोर्टलच्या माध्यमातुन घरखरेदी दारांना घरबसल्या घर खरेदी करण्याचा आनंद घेता येणार आहे. ऑनलाईन प्रदर्शनात १०० विकासकांचे १५० च्या आसपास प्रोजेक्टची माहिती मिळेल. त्यामुळे या नविन पोर्टलचा जनतेला उपयोग होईल, विकासकांच्या सर्व प्रोजेक्टची माहिती, नविन स्कीगची माहिती एक क्लिकवर ग्राहकांना मिळेल. शासनाने स्टॅम्पडयुटी व गृह कर्जावरील व्याजदरात कपात केल्यामुळे ग्राहकांमध्ये घर खरेदी बाबत उत्साह निर्माण झाल्याचे दिसुन येते. मागील दोन महीन्यात घर खरेदीत सुमारे ५०% पेक्षा जास्त वाढ झाल्याचे आकडे समोर आलेले आहेत. त्यामुळे mymchi.com या पोर्टलच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन ग्राहकांना विकासकांच्या प्रकल्पाला घर खरेदी करणेबाबत सुलभता निर्माण होईल. या योजनेचा जनतेने फायदा करून घ्यावा असे आवाहन अध्यक्ष श्रीकांत शितोळे, माजी अध्यक्ष रवि पाटील यांनी केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी विकास जैन रोहित भोईर जयेश तिवारी रोहित दिक्षीत मिलींद चव्हाण अरविंद वरक दिनेश मेहता आदी उपस्थित होते.
*****