डोंबिवली /प्रतिनिधी : डोंबिवली शहरातील दानशूर व्यक्तिमत्व प्रल्हाद परशुराम म्हात्रे यांनी आजपर्यंत अनेक समाजसेवा केलेली आहे. गोरगरिबांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मैत्री कल्याणकारी संस्थेच्या वतीने त्यांना आदर्श कुटुंब प्रमुख पुरस्कार देण्यात आला आहे.
प्रल्हाद म्हात्रे हे मनसे शहर संघटक पदावर काम करीत आहेत. लहान मुलांच्या हृदयाचे ऑपरेशनचा सर्व खर्च असो वा पुरात पडलेल्या बिल्डींग मधील पीडित रहिवाशांचे पुनर्वसन, अपंग व्यक्तींना तीन चाकी गाड्या, कॅन्सरग्रस्त पीडितांना औषधोपचार व रेशन पाणी, होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च ,कलाकारांना आर्थिक व अन्नधान्याची मदत तसेच निराधार असलेल्या वृद्ध व्यक्तींचे पालनपोषण ,दुर्गंधी असलेले गार्डन चे सुशोभीकरण, शरीर सौष्ठव तसेच किकबॉक्सिंग क्षेत्रातील उमेदवारांना आर्थिक सहाय्य ,गरीब घरातील मुलींच्या संपूर्ण लग्नाचा खर्च , कोरोना कालावधीमध्ये कलावंतांसाठी तसेच वकिलांसाठी ऑनलाइन गायन तसेच डान्स स्पर्धा आयोजन व प्रोत्साहन तसेच सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेचे आयोजन अशा सर्वानाच मदतीचा हात दिला आहे. मैत्री कल्याणकारी संस्था अध्यक्ष कविता देशपांडे आणि सचिव एडवोकेट प्रदीप बावस्कर यांच्या हस्ते आदर्श कुटुंब प्रमुख या सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले .याप्रसंगी हिम्मत मात्रे, गायक आनंद पाटील , प्रवीण कल्याणकर, राम म्हात्रे तसेच समाजसेवक शर्मिला लोंढे, नामवंत निवेदक शिवा गायकवाड आणि कोरिओग्राफर महेश दवंडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
*****