कल्याण/ प्रतिनिधी : कल्याणकरांची डम्पिंगच्या दुर्गंधीतून आता लवकरच मुक्तता होणार आहे. डम्पिंग ग्राउंडवर पार्क बनविण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यामुळं येत्या विजया दशमीच्या मुहूर्तावर आधारवाडी डम्पिंग बंद करण्याचे पालिकेचे नियोजन आहे त्यामुळे कल्याण करांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी ठरली आहे.

आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर दररोज 650 मेट्रिक टन कचरा जमा होत. मात्र लोकडाऊनच्या काळात पालिकेने कचरा वर्गीकरण मोहीम राबविल्याने त्यापैकी 500 टन कचऱ्याचे नागरिकांकडून वर्गीकरण होत आहे. त्यामुळे सध्या 159 टन कचरा डम्पिंगवर टाकला जात आहे. या कचऱ्याचे स्क्रीनिग करून  त्याठिकाणी पार्क चा प्रस्ताव पालिकेने तयार केला असून विजया दशमीपासून आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणे बंद करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.मागील 40 वर्षापासून डम्पिंगच्या दुर्गधीचा त्रास  कल्याणकर सोसत आहेत. डम्पिंग बंद करण्याचे पालिकेचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत.  न्यायालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनीही पालिकेला डम्पिंग वरून फटकारले आहे. मात्र पालिका प्रशासनाच्या मोहिमेला यश  आल्याने लवकरच कल्याणकारांची डमिंगच्या दुर्गंधीतून सुटका होणार आहे.

*****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!