सांगली जिल्ह्याची स्नूषा डॉ. स्मिता मोहितेंनी जिंकली स्पर्धा

मुंबई –  इंग्लंडची राजधानी लंडन येथे आयोजित ‘मिसेस इंडिया युके’ या इंग्लंडस्थित  भारतीय विवाहित महिलांसाठीच्या सौंदर्यस्पर्धेत मराठमोळ्या महिला डॉक्टर  आणि सांगली जिल्ह्याची स्नूषा डॉक्टर स्मिता प्रशांत मोहिते यांनी बाजी मारली आहे. अलिकडेच लंडन येथे पार पडलेल्या या स्पर्धेत ‘मिसेस इंडिया युके २०२०’चा मुकूट त्यांनी जिंकला.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील सोहोली या गावातील मूळ रहिवासी असलेले डॉक्टर प्रशांत नानासाहेब मोहिते हे गेली १० वर्षांपासून लंडन येथे ह्दय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण तज्ञ्ज म्हणून  हेअरफिल्ड हास्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्यांची पत्नी डॉ. स्मिता मोहिते या सुद्धा कर्करोग तज्ञ्ज म्हणून लंडनमध्ये कार्यरत आहेत.

लंडन येथील एजीपीएल समुहाकडून दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते. यावर्षी कोरोना असल्याने तीन महिन्यात टप्प्याटप्प्याने ही स्पर्धा विविध निकषांवर घेण्यात आली. स्पर्धकांना प्रश्नेही विचारण्यात आली आणि त्यांची बुद्धीमत्ता, समयसूचकता तपासण्यात आली. विविध कसोट्यांवर सरस ठरलेल्या डॉ. स्मिता मोहिते यांना १६ आगस्ट रोजी मिसेस इंडिया युके या पुरस्काराने एका खास सोहळ्यात सन्मानितही करण्यात आले. धुळे येथील ऍड.भालचंद्र पवार आणि उषा पवार यांच्या त्या कन्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *