महिलांच्या छेडछाडप्रकरणी जाब विचारणा-या पत्रकारास धमकावले
घाटकोपर : पश्चिम आर बी कदम मार्गावर रोडरोमियोकडून मुलींची छेडछाड होत असल्या प्रकरणी या रोडरोमीयोचा फोटो काढून जाब विचारण्यास गेलेल्या पत्रकार महेश पोळ यांनाच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. या अनोळखी व्यक्ती विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे . आर बी कदम मार्गावर दररोज काही व्यक्ती नशा करून महिलांशी अश्लील शब्द वापरून छेडछाड करतात. गेल्या आठवड्या पासून रोडरोमीयोच्या छेडछाडीचे प्रकार सुरू असल्याने यांना जाब विचारण्यासाठी गेलेले स्थानिक पत्रकार महेश पोळ यांना धमकावण्यात आले. मात्र पोळ हे आपल्या कॅमे- यातून त्यांचा फोटो टिपत असतानाच ते पसार झाले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक बाबर हे तपास करीत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून पत्रकारांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत . पत्रकार ज्या ज्या वेळी समाजाप्रती ठोस भूमिका घेतात तेव्हा तेव्हा पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. रोडरोमीयोकडून महिलांची छेडछाड होत आहे . यांना पोलिसांची कसलीच भीती राहिलेली दिसत नाही . मुंबईत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत पण हे किती उपयोगाचे आहेत. संशयास्पदप्रकार कॅमे- यात टिपल्यानंतर पोलिसांकडून कारवाई होणे आवश्यक आहे तरच हे प्रकार थांबतील तसेच आर बी कदम मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत असेही पत्रकार महेश पोळ यांचे म्हणणे आहे.