कल्याण /प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर व आसपासच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण झपाटयाने वाढत आहेत. सरकारी यंत्रणा,पोलीस यंत्रणा ,डॉक्टर, सफाई कामगार, यांचे प्रयत्न अपुरे पडताना दिसत आहेत. त्यामुळे या परिसरासाठी उच्चस्तरिय स्वतंत्र IAS अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी जेणेकरून येथील सर्व यंत्रणाना केंद्रित करण्यास मदत होईल अशी मागणी आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे.
मार्च महिन्यापासून कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी सतत लॉकडाऊन घेत आहोत व वाढवत आहोत.पण कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर व आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिक विशेषतः तरुण वर्ग किराणा सामान, दूध,औषध इत्यादी अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्याचा बहाण्याने बिनदिक्कत घरबाहेर फिरताना दिसत आहेत.त्यामुळे ज्या हेतूसाठी लॉकडाऊन घेतला आहे तो हेतू साध्य होत नसल्याचे दिसून येत नाही. ग्रामीण भागात परिस्थिती अजूनही भयानक आहे, त्यामुळे कल्याण ,डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ,डोंबिवली, बदलापूर, व आजूबाजूच्या ग्रामीण भागांसाठी उच्चस्तरिय स्वतंत्र IAS अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी जेणेकरून येथील सर्व यंत्रणा ना केंद्रित करण्यास मदत होईल व या भागात रुग्णांसाठी औषध उपचार, रुग्णवाहिका या सारख्या सोयी सुविधा यासाठी मदत होऊ शकते. तसेच कल्याण डोंबिवली व आजूबाजूचा ग्रामीण भाग हा कोरोना चा हॉट स्पॉट बनला आहे. त्यामुळे नागरिक आपला जीव वाचविण्यासाठी शर्तीने प्रयत्न करत आहेत, तसेच मुंबईतील धारावी तसेच मालेगाव पॅटर्न राबविण्याची मागणी वझे यांनी केली आहे.