कोवीड 19 अ‍ॅटीजन टेस्टींग सेंटरचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते उद्घाटन :

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने कोवीड 19 रॅपिड ॲंटीजन किटसच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या टेस्टींग सेंटरचे उद्घाटन आज राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय कळवा येथे पार पडले.     

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चाचण्याचे प्रमाण वाढविण्यासंदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने महापालिकेने जवळपास 1 लाख कोवीड 19 रॅपिड अँटीजन किटस मागविले आहेत. या किटसच्या माध्यमातून चाचणी केल्यानंतर केवळ 30 मिनिटात चाचणीचे निकाल प्राप्त होत असल्याने योग्यवेळी कोवीड संशयित व्यक्तींस गाठून त्याच्यावर वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे.     

सद्स्थितीमध्ये ठाणे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय, सी. आर. वाडिया हॅास्पीटल, कोरस आरोग्य केंद्र आणि घोडबंदर रोडवर रोझा गार्डनिया येथील आरोग्य केंद्र या चार ठिकाणी ही चाचणी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून या ठिकाणी तात्रिक आणि इतर सर्व प्रकारचे मुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.  प्रामुख्याने शहरातील हॅाटस्पॅाटस, प्रतिबंधित क्षेत्रे, झोपडपट्टी आणि दाटीवाटीची वस्ती असलेल्या प्रभागातील कोवीड संशयित रूग्णांची चाचणी या रॅपिड अँटीजन किटसच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!