मराठी भारती संघटनेचे अव्वाच्या सव्वा आलेले लाईट बिल आणि विजेचे वाढीव दर ह्या विरोधात विरार येथे धरणे आंदोलन करण्यात आले, ह्यात नागरिकांनी आपले आलेले वाढीव बीज बिल दाखवत त्याचा निषेध केला.
संघटना गेले अनेक दिवस वीज बिलाचा मुद्दा घेऊन लढत आहे आज लोकांना रोजगार नाही अश्यात एवढ्या मोठ्या रकमेची बिल भरणे लोकांना शक्य नाही त्यामुळे गरीब- मध्यम वर्गाचा विचार करून 200 युनिट पर्यंत मोफत वीज आणि 200 युनिट पेक्षा अधिक बिलात 50% सूट मिळाली पाहिजे अशी मागणी अध्यक्ष ऍड. पूजा बडेकर ह्यांनी केली.
गेले अनेक दिवस बिलाच्या विरोधात नागरिक बोलत आहे परंतु ऊर्जा मंत्री मात्र झोपले आहेत त्यांना लोकांचे काहीच पडले नाही का असा सवाल कार्यध्यक्ष विजेता भोनकर ह्यांनी केला.
आज कोरोनाच्या काळात तरुण मूल मरत आहेत लोकांच्या मध्ये अतिशय भीतीचे वातावरण आहे आणि अश्या वेळी त्यांच्या कढून ही अमाप विज बिल आकारणी म्हणजे अन्याय आहे असे उपाध्यक्ष आशिष गायकवाड ह्यांनी म्हंटले तसेच जो पर्यन्त हा गोंधळ थांबत नाही तो पर्यन्त गप्प बसणार नाही असे विधान कार्यवाह अनिल हाटे ह्यांनी केले.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत ह्यांनी ह्यात लवकरात लवकर लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा मराठी भारती संघटना घंटानाद आंदोलन करेल असा इशारा संघटक राकेश सुतार ह्यांनी दिला असल्याचे पत्रक प्रवक्ता सोनल सावंत ह्यांनी म्हंटले आहे.