रियल इस्टेट क्षेत्रात एक नावाजलेली कंपनी म्हणून रिजन्सी ग्रुपचे नाव घेतले जाते. अठरा वर्षापूर्वी स्थापन झालेल्या रिजन्सी ग्रुपने रियल इस्टेट इण्डस्ट्रीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. परवडणा-या किंमतीत लक्झरी जीवनशैली देणारे गृहप्रकल्प साकारले आहेत. रिजन्सी ग्रुपने आतापर्यंत तब्बल १५ हजार कुटूंबांच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे स्वत:च्या घराचे स्वप्न बाळगणा या सर्वसामान्यांच्या मनात रिजन्सी ग्रुपने एक विश्वासाचं स्थान पटकावलं आहे असे मत रिजन्सी ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश अग्रवाल यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले.
ठाणे, नवी मुंबई डोंबिवली उल्हासनगर आणि पुणे याठिकाणी रिजन्सी ग्रुपने २० गृहप्रकल्प उभे केले असून, सुमारे ८० लाख स्क्वेअर फूट बांधकाम केले आहे. आतापर्यंत तब्बल १५ हजार घर बांधली असून, १५ हजार कुटूंबियांना ताबा दिला आहे. गुणवत्तापूर्वक लक्झरीस घरांसमवेत क्लब हाऊस, स्वीमिंग, गार्डन आदी सर्व प्रकारच्या अॅमिनिटेजही ग्राहकांना देण्यात आल्या आहेत. मध्यमवर्गीयांना परवडतील अशा घरांच्या किंमती असून, सर्वसामान्यांची जीवनशैली आल्हादायक बनविण्याचा प्रयत्न रिजन्सी ग्रुपने केला आहे असे अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. टिटवाळा येथील निसर्गाच्या सानिध्यात ६८ एकरात रिजन्सी सर्वम प्रकल्प काळू नदीच्या काठावर कंपनीचा महत्वकांक्षी प्रकल्प वसलेला आहे. तसेच डोंबिवलीतही अनंतम गृहप्रकल्प साकारला जात आहे. मध्यमवर्ग ग्राहकाला अपेक्षित असलेल्या सर्व सोयी सुविधा या टाऊनशिपमध्ये साकारल्या आहेत असे अग्रवाल यांनी सांगितले.
राज्य सरकारकडून बिल्डरांच्या अनेक अपेक्षा आहेत. महापालिकेचे चार्जस अधिक आहेत, ते कमी केेले पाहिजेत. अनेक प्रकल्प हे फायनान्सच्या कारणामुळे अडकतात. त्यामुळे बिल्डरांना फायनान्सची मोठी अडचण येते. त्यासाठी राज्य सरकारकडून दिलासा मिळणे गरजेचे आहे, पर्यावरणबाबतीत जलद गतीने काम झालं पाहिजे. शहरात मेट्रो प्रोजेक्ट येत आहे त्यामुळे शहराची कनेक्टीव्हिटी वाढणार आहे. मात्र राज्य सरकारकडून बिल्डरांवर आकरण्यात आलेला मेट्रेा सेेस लादला जाऊ नये. राज्यात महाविकास आघाडीचे नवीन सरकार स्थानापन्न झाले आहे. नवीन सरकार चांगले काम करतील अशी आशा अग्रवाल यांनी व्यक्त केली. तसेच राज्याच्या नगरविकास मंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी कारभार स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही रियल इस्टेट क्षेत्राला नक्कीच अच्छे दिन येतील असेही अग्रवाल म्हणाले.
————