चर्नीरोडनजीक पुलाच्या पाय-यांचा भाग कोसळला
मुंबईतील चर्नीरोड स्थानकाजवळ असलेल्या पादचारी पुलाच्या पायऱ्यांचा काही भाग कोसळल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत दोनजण जखमी झाले आहेत.
चर्नीरोडच्या महर्षी कर्वे रोडवर असलेला हा पादचारी पूल आहे. हा पूल धोकादायक असल्याने त्याच्या पुनर्बांधणीकरता तोडकाम हाती घेण्यात आले होते. मात्र रेल्वेच्या हाय टेन्शन केबल्स गेल्यामुळे हे काम काही दिवसांपासून थांबवण्यात आले होते. पुलाच्या पाय-या कोसळल्याची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे मागील आठवड्यात याच पुलासाठी पथनाट्याच्या माध्यमातून आंदोलनही करण्यात आले होते. आंदोलकांनी पालिका अधिकाऱ्यांना काम लवकर सुरू करण्यासाठी निवेदनही दिले होते. मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर ऐरणीवर आलाय. २९ सप्टेंबरला चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३८ प्रवासी जखमी झाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!