कल्याण डेांबिवली करोनाग्रस्ताच्या संख्येेत वाढ 
टेस्टींग लॅब सुरू करण्याची काँग्रेसची मागणी 
कल्याण : जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले असतानाच डोंबिवलीतही करोना ग्रस्त रूग्णांची संख्या आठवर पोहचली आहे. मात्र महापालिकेच्या रूग्णालयात अवघे ३२ डॉक्टर्स असून करोना तपासणीचे एकमेव किट उपलब्ध झाले आहे त्यामुळे रूग्णांची वाढती संख्या पाहता महापालिकेच्या रूग्णाालयात टेस्टींग लॅब सुरू करण्यात यावी तसेच इतर वैद्यकिय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सचिव संतोष केणे यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात करोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे सावट आहे. विशेष करून मुंबई ठाणे आणि कल्याण डोंंबिवली शहर व ग्रामीण परिसरातही रूग्णांची संख्या वाढत आहे. कल्याण डोंबिवली शहरात आतापर्यंत ८ जण करोग्रस्त असून हळूहळू संख्या वाढत आहे. महापालिकेचे डोंबिवलीला शास्त्रीनगर व कल्याणला रूक्मिणीबाई असे दोन रूग्णालये आहेत. मात्र या रूग्णालयात करोनाग्रस्त रूग्णांची तपासणी केली जात नाही. त्यासाठी रूग्णांना मुंबईच्या कस्तुरबा रूग्णालयात जावे लागत आहे. महापालिकेच्या दोन्ही रूग्णालयात अवघे ३२ डॉक्टर्स असून अवघे एकच किट उपलब्ध झालं आहे मात्र रूग्णांची वाढती संख्या  लक्षात घेता तपासणीचे किट वाढविण्यात यावे याकडं केणे यांनी शिंदे यांचे लक्ष वेधले आहे. तसेच शहरातील प्रत्येक भागात जंतुनाशक फवारणी करणे गरजेचे आहे मात्र त्याकडेही पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे याकडेही त्यांनी पालकमं़याचे  लक्ष वेधले आहे  राज्यभरात लॉकडाऊन घोषित केला आहे त्यामुळे नागरिांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारमधील सर्वच मंत्री या व्हायरसशी लढा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जनतेला दिलासा मिळत असलयाचेही केणे यांनी स्पष्ट म्हटलंय.
——————————————–

https://youtu.be/ZTgiAfhXzJo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *