बाधित प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी  काँग्रेसचे नेते संतोष केणे यांचे  महसूल मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना साकडं

 

नवी मुंबई :  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांनी सिडकोकडून  झालेल्या अन्यायाविरोधात गेल्या १७ दिवसांपासून ठियया आंदोलन छेडले आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी  काँग्रेसचे प्रदेश सचिव व आगरी कोळी भूमिपूत्र महासंघाचे  नेते संतोष केणे यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विधानसभेचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांना साकडं घातलं आहे.

सिडकोने महसूल विभागाशी संगमनत करून प्रकल्पग्रस्तांकडून त्यांना अंधारात ठेवून त्यांच्याकडून संमतीपत्र घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे तसेच सिडकोने जी आश्वासने दिली त्याची अंमलबजावणी केली नाही तसेच त्या प्रकल्पग्रस्तांकडे स्वत:चे घर नसल्याने त्यांना राहण्यासाठी दुसरा पर्याय नाही त्यामुळे २३ डिसेंबर २०१९ पासून शेकडो प्रकल्पग्रस्त सिडको कार्यालयासमोर मुक्कामी आंदोलनाला बसले आहेत.  काँग्रेसचे प्रदेश सचिव व आगरी कोळी भूमिपूत्र महासंघाचे नेते संतोष केणे यांनी दोनवेळा प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी सर्वपक्षीय संघर्ष समितीचे नेते गणेश म्हात्रे, पनवेल जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आर सी पाटील, कार्याध्यक्ष सुदाम पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित हेाते. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाकडे सरकारी यंत्रणेकडून कानाडोळा केल्याने त्यांच्या मागण्यांवर  सविस्तर चर्चा करण्यासाठी व त्यांना न्याय मिळावा यासाठी आपल्या दालनात बैठकीचे आयेाजन करण्यात यावे अशीही मागणी केणे यांनी निवेदनात केली आहे.

—-

 काय आहेत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या 

१ शून्य पात्रता व अपात्र पध्दती बंद करून सरसकट पूर्नवसन पॅकेज लागू करावे
२ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधीत झालेल्या मच्छिमार व्यावसायिकांना २०१३ च्या काद्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी
३ जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच प्रश्न सूटत नाहीत तोपर्यंत सिडकोने प्रकल्पग्रस्तांचे कोणतेही बांधकाम तोडू नयेत
४ प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना रोजगारभिमुख प्रशिक्षण मिळावे
५ घर मिळत नाही तोपर्यंत बाजारभावाप्रमाणे घरभाडे मिळावे
६ साडेबारा टक्के वाटप त्वरीत करण्यात यावे
७ वाढीव बांधकाम खर्च अडीच हजार मिळावा
८ सिडकोने घरे बांधण्यासाठी आर्किटेक्ट ची नेमणूक करावी

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!