डोंबिवलीतील बत्तीगुलची समस्या लवकरच निकाली निघणार 
शहरप्रमुखाचा पाठपुराव्याला यश : खासदार निधी मिळाला 

डोंबिवली  :  डोंबिवली पूर्वेकडील  अनेक भागात  वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने या  त्रासाने नागरिक हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेश मोरे यांनी पाठपुरावा सुरू केल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी वीज वितरण कंपनीच्या अधिकायांशी तातडीने बैठक घेतली त्यासाठी आवश्यक खासदार निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही शिंदे यांनी स्पष्ट केले त्यामुळे खासदार निधी उपलब्ध झाल्यानंतर कामाला त्वरीत सुरूवात करण्यात येईल असे वीज वितरण कंपनीच्या अधिका़यांनी स्पष्ट केले त्यामुळे आता  डोंबिवलीतील बत्तीगुलची समस्या लवकरच निकाली निघणार

डोंबिवलीतील राजेंद्र प्रसाद रोड, 4 रस्ता, रघुवीर नगर, कस्तुरी प्लाझा, रामनगर, मनोरमा सोसायटी, चंद्रमा सोसायटी या परीसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून घडत आहेत. वारंवार बत्तीगुल होत असल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. यातून नागरीकांची मुक्तता होण्यासाठी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख  राजेश मोरे हे प्रयत्नशील आहेत. पण सदर कामात महाराष्ट्र विज वितरण कंपनीकडून खूपच दिरंगाई होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शहरप्रमुख राजेश मोरे यांनी ही बाब खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तातडीने विजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असता यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. खासदार डॉ. शिंदे यांनी याबाबत तातडीने जिल्हा नियोजन खात्याकडून यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून सदर कामास यामुळे गती येणार आहे. याबाबत विजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला व सदर काम पुढील महिन्याच्या आत पूर्ण होईल अशी ग्वाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीस खासदार डॉ. शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, नगरसेवक दिपेश म्हात्रे व शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेश मोरे, तर महावितरण कंपनीतर्फे विभागीय संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधिक्षक अभियंता सुनिल काकडे, धर्मराज शिंदे, शैलेंद्र राठोड, प्रवीण परदेशी व अतिरीक्त कार्यकारी अभियंता कलढोण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *