ज्येष्ठ समाजसेवक व अभ्यासू पत्रकार सुभाष महाजन यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करावी :  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडं साकडं

मुंबई  :  कला, क्रिडा, सांस्कृतीक, सामाजिक, शैक्षणिक, कामगार  पत्रकार आदी विविध क्षेत्रात कार्यरत असणारे आणि  गेली तब्बल चाळीस वर्षे एकनिष्ठतेने कोणतेही पद न मिळताही शिवसेना पक्षाशी प्रामाणिक असणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व निष्ठावंत शिवसैनिक  सुभाष महाजन यांची  राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती करावी अशी लेखी मागणी विविध संघटनांकडून शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे

मुंबई प्रदेश काँग्रेस सचिव अॅड.धर्मेष व्यास,  महाराष्ट्र ग्रामिण पञकार संघ, मराठी पञकार संघ , प्रेस क्लब ऑफ इंडिया नवी दिल्ली रिपब्लिकन पार्टी ऑफ  इंडिया सोशल मिडीया आयटी सेल, तिपन्नानगर रहिवासी संघ, सम्राट अशोक नगर रहिवासी संघ, भारतीय असंघटीत कामगार संघटना, आशा सामाजिक शैक्षणिक संस्था  अशा विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष महाजन यांच्यासाठी मुख्यमंत्रयाकडे साकडं घातलं आहे

डोंबिवलीकर रहिवाशी असलेले ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते सुभाष महाजन हे स्टेट बँक कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आहेत. तसेच विविध संस्था आणि संघटनेवर तसेच शासकीय कमिटीवर कार्यरत आहेत. महाजन यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाजरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  काही दिवसांपूर्वीच त्यांना राज्य शासनाच्या पर्यटन सांस्कृतिक कला महोत्सव समिती यांच्यावतीने राष्ट्रीय उत्कृष्ट समाजसेवक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच भारत सरकारच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची आजीव मेंबरशिप त्यांना प्रदान करण्यात आली आहे. तसेच मराठी वृत्तपत्रलेखक संघ यांच्या वतीने देण्यात येणार यंदाचा ‘ पत्रभूषण २०१८ ‘ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. महाजन हे अनेक वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. महाजन हे सर्व क्षेत्राशी संल्ग्न असल्याने त्यांचा गाढा अभ्यास आहे  त्यामुळे विधान परिषदेवर महाजन यांच्यासारखे अभ्यासू व्यक्तीमत्वाची निवड व्हावी अशी अपेक्षा विविध संघटनांकडून करण्यात आली आहे  महाजन हे विविध क्षेत्रात काम करीत असल्याने त्या क्षेत्रातील प्रश्नांची त्यांना जाण आहे त्यामुळे   राज्यपाल नियुक्त कोटयातून विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती केल्यास ते प्रश्न विधान परिषदेत अभ्यासपूर्ण मांडून सोडवू शकतात त्यामुळे अभ्यासू व्यक्तीमत्वाची निवड करावी असेही विविध संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *