ठाणे जिल्हा आगरी संघटना आणि आगरी गौरव समितीतर्फे  ४७२ गुणीजनांचा सत्कार 

 गटविकास अधिकारी राहुल म्हात्रे  आगरी गौरव पुरस्काराने  सन्मानित !
डोंबिवली ; आगरी समाजातील तरुणांनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. अशा उल्लेखनीय कामगिरी करून समाजाचे नावलौकिक करणाऱ्या गुणिजनांना ठाणे जिल्हा आगरी संघटना आणि आगरी गौरव समितीतर्फे  सन्मान करण्यात आला  गटविकास अधिकारी राहुल म्हात्रे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आगरी- कोळी समाजाचे नेते गणेश म्हात्रे यांचे ते चिरंजीव आहेत. काँग्रेसचे कोकण विभागाचे समनव्यक आणि आगरी कोळी समाजाचे नेते संतोष केणे यांनी गुणीजणांचे अभिनंदन केले आहे.
ठाणे जिल्हा आगरी संघटना आणि आगरी गौरव समितीतर्फे  समाजात उल्लेखनीय कामगिरी तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या आगरी समाजातील ४७२ गुणीजनांचा सत्कार करण्यात आला. बालयोगी सदानंद महाराज यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते गुणिजनानं प्रस्तीपत्रक आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तलासरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल म्हात्रे यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी
काही दिवसांपूर्वी बोरगाव उंबरगाव मार्गावर  झाई बोरगाव हद्दीत तांबडपाडा या ठिकाणी झालेल्या अपघातात नरेश गीभल हा तरूण गंभीर झाला होता या अपघाताच्या ठिकाणी बघ्याची संख्या अधिक होती मात्र त्याला मदत करण्यासाठी कोणीही पुढे सरसावत नव्हते. यावेळी पाहणी दौ-यावर आलेले तलासरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल म्हात्रे यांनी त्यांच्या सहका-यांसह  घटनास्थळी धाव घेऊन जखमी तरूणाला रूग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार केले. गटविकास अधिकारी राहुल म्हात्रे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतूक होत आहे. आगरी समाजाचा हा देखण्या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *