कोकणात काँग्रेसचा प्रचारातून सेना- भाजपला चेकमेट !
काँग्रेस नेते बी. एन. संदीप आणि कोकण समनव्यक संतोष केणे यांचा कोकणात प्रचाराचा धडाका …
कोकण (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली असतानाच, कोकणात सेना भाजपला चेकमेट देण्यासाठी काँग्रेस ने प्रचाराचा धडाका लावला. अखिल भारतीय काँग्रेस चे सचिव आणि कोकण चे प्रभारी बी. एन. संदीप आणि काँग्रेस चे कोकणचे समनव्यक संतोष केणे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कोकण परिसर पिंजून काढला.
काँग्रेस चा विजय असो, राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है ..अश्या घोषणांनी हजारो कार्यकर्त्यांची प्रचार रॅली निघाली. ठाण्यापासून ते कणकवली राजापूर पर्यंत प्रचाराचा झंझावात सुरू होता. काँग्रेसचे बडे नेते बी. एन. संदीप आणि संतोष केणे यांनी बुध आणि वार्ड लेव्हलच्या कार्यकर्त्यांशी भेटी गाठी घेऊन त्यांनाही मार्गदर्शन केले. भाजप- शिवसेनेच्या भूलथापाना बळी पडू नका.. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन काँग्रेसचे नेते बी. एन. संदीप आणि संतोष केणे यांनी केले.
————
हे आहेत कोकणातील काँग्रेसचे उमेदवार …
पालघर – योगेश नम
भिवंडी (प) : शोएब (गुड्डू खान)
भिवंडी ( पू) : संतोष शेट्टी
कल्याण (प) : कांचन कुलकर्णी
अंबरनाथ : रोहित साळवे
डोंबिवली : राधिका गुप्ते
मीरा भाईंदर : सययद हुसेन
ओवळा-माजीवडा ; विक्रांत चव्हाण
कोपरी- पाचपाखाडी ; संजय घाडीगांवकर
पेण : नंदा म्हात्रे
अलिबाग : श्रद्धा ठाकूर
महाड : माणिक जगताप
राजापूर : अविनाश लाड
कणकवली : सुशील राणे
कुडाळ : चेतन मोडकर
——–