वाहतूक केांडीचा परिणाम गुन्हयांच्या घटनेत वाढ
डोंबिवली (प्रतिनिधी) : डोंबिवली शहरात पश्चिमेला विष्णुनगर तर पूर्वेला रामनगर, टिळकनगर आणि मानपाडा ही चार पोलीस ठाणी आहेत. मानपाडा पोलीस ठाण्याची हद्द खूप मोठी असून २७ गावांचा परिसर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. मानपाडा पोलीस ठाण्यातंर्गत दावडी अथवा काटई हे नवीन पोलीस ठाणे करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्याचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कल्याणचे पोलीस परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी डोंबिवली पत्रकार संघाने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात दिली. त्यामुळे राज्य सरकारच्या मंजुरीनंतर डोंबिवलीत लवकरच एक नवीन पोलीस ठाणं उभारण्यात येणार आहे. तसेच वाहतूक केांडीचा परिणाम गुन्हेगारी घटनां वाढण्यात होत असल्याचेही पानसरे यांनी सांगितलं.
कल्याण पोलीस परिमंडळात पाच विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यात जेलमधून सुटून आलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला हद्दीतून बाहेर घालविले जात आहे . तसेच दहा वर्षापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचे रेकॉर्ड तपासून, नव्या आरोपीचे रेकॉर्ड तयार केले जात आहे. गेल्या दहा वर्षात पिस्तूलाचा वापर करणा-या आरोपींची यादी तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. प्रत्येक आरोपींची कुंडली तयार करण्यात आली आल्याचे पानसरे यांनी सांगितलं. शहरात सीसी टिव्ही असणे गरजेचे आहे. स्कायवाॅकवर सीसी टिव्ही आणि लाईट लावण्यासंदर्भात मागणी केली आहे. प्रत्येक सोसायटीने सीसी टिव्ही लावणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितल. काही दिवसांपूर्वीच पेट्रोल पंपाची सुमारे १२ लाखाची रक्कम लुटून पळणा-या सहा जणांच्या टोळीला पकडण्यात पोलीसांना यश आलं होत. या आरोपीवंर मोक्कातंर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहितीही पानसरे यांनी दिली. तसेच आंधप्रदेश येथील टकटक गँग जेरबंद करण्यात आली. तसेच नागरिकांचा चोरीला गेलेला मुद्देमालही परत केला असून प्रत्येकजण वाहतूक केांडीत अडकून पडत असल्याने चैन स्नॅचिंग करणा-यांचे धाडस वाढत आहे. चैन स्नॅचिंग करून चोरटे मोटारसायकलने पळून जातात. तसेच वाहन कोंडीमुळे वाहन चालक व नागरिक पॅनिक होऊन अनेकवेळा हाणामारीचे प्रकार घडत आहेत असे पानसरे यांनी सांगितलं. मात्र चैन स्नॅचिंग घटनांना आळा घालण्यासाठी व चोरटयांच्या शोधासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथक तयार करण्यात आल्याचे त्यांनी आहेत. तत्पूर्वी डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष विकास काटदरे आणि कार्याध्यक्ष श्रीराम कांदू यांनी पोलीस अधिका- यांचे स्वागत केले. मुरलीधर भवार यांनी प्रस्तावना तर शंकर जाधव यांनी आभार मानले. ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य यांच्या पुढाकाराने वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. **