स्टेट बँक स्थापना दिनानिमित्त ग्राहक मेळावा
कारलोन्स विभागाचे उद्घाटन
कल्याण : भारतीय स्टेट बँकेच्या स्थापना दिना निमित्त सोमवारी कल्याण मुख्य शाखेत ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास उप महाव्यवस्यापक आप्पाराव साहेब , सहाय्यक महाव्यस्थापक कपिल गर्ग , कल्याण मुख्य शाखेचे वरिष्ठ व्यवस्यापक कैलास खोत आदी अधिकारी , कर्मचारी, असंख्य खातेदार व प्रतिष्ठीत ऊपस्थित होते. यावेळी कार्स लोन मेळावा (विभाग) व आर ए सी पी सी विभागाचे ऊद्घाटनही मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. शाखेचे मुख्य व्यवस्थापक
कैलास खोत यांनी आठवडाभरापूर्वीच पदभार स्वीकारल्यानंतर कामांचा धडाका लावला आहे. त्यांनी बँकेचा चेहरा -मोहराच बदलून टाकला असून, बँकेतील स्वच्छता, कामातील नीटनेटकेपणा, जलद ग्राहक सेवा , झटपट कर्ज योजना आखल्याने ग्राहक वर्ग स्टेट बँकेकडे आकर्षित झाला आहे. बँकेतील कर्मचा-यांशी, सहकारी अधिकारी वर्गाशी जिव्हाळ्याचे सबंध प्रस्थापित करून एक वेगळा आदर्श जिव्हाळा खोत साहेबांनी निर्माण केल्याची भावना कर्मचा-यांनी व्यक्त केली.
———————-