विद्यार्थी भारतीचे 13 वे राज्यस्तरीय वार्षिक शिबीर ३ ते ९ जूनला
#अपडेट 2 अपग्रेड… अशी थीम
कल्याण : विद्यार्थी भारती वर्षभरात वेग वेगळ्या प्रकारची उपक्रमे तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असते. त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजेच दरवर्षीच वार्षिक शिबिराचे आयेाजन केले जाते. विद्यार्थी भारती आयोजित 13 वे राज्यस्तरीय वार्षिक शिबीर दि 3 जून ते 9 जून या दरम्यान वाशिंद पूर्व येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळा येथे आयोजित करण्यात आले आहे. #अपडेट 2 अपग्रेड अशी या शिबीराची थीम आहे अशी माहिती राज्यकार्यवाह श्रेया निकाळजे यांनी सांगितले.
तरुण पिढी ही सध्याच्या काळाप्रमाणे,चाललेल्या युगाप्रमाणे,सर्व गोष्टीची माहिती तर जाणून घेतच आहे व दिवसेंदिवस अपडेट तर होतच आहेत पण त्या ही पुढे जाऊन तरुणपिढीने विचारांच्या दृष्टीने , कृतीने , मानसिकतेने , सामाजिक अनुषंगाने म्हणजे च एकंदरीत सर्वच गोष्टीत अपग्रेड सुद्धा झालं पाहिजे हा मूळ उद्देश ह्या शिबिराचा आल्याचे राज्यकार्यवाह श्रेया निकाळजे यांनी सांगितले. या शिबिराची खासियत म्हणजे ह्या शिबिराला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातून मुलं आवडीने येत असतात. एक महत्वाच म्हणजे प्रत्येक उपक्रमाला सामाजिक बांधिलकी असते व दरवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यात हे शिबीर घेतल जाते. जेणेकरून त्या विभागातील मुलांना सुद्धा ह्या शिबिराचा आनंद घेता यावा तसेच ह्या शिबिरात आम्ही वेगवेगळे उपक्रम घेणार आहोत जस की मैदानी खेळ, मतदान, लघुचित्रपट, चर्चा, गाणी, पथनाट्य, फ्लॅशमॉब, दोषी कोण, असे वेगवेगळे उपक्रम घेत असल्याचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सर्वेश लवांडे यांनी मांडले आहे शिबिरात 80 ते 100 विद्यार्थी उपस्थित असतात तसेच हे शिबीर विद्यार्थ्यांसाठी मोफत आयोजित केलेल आहे..ज्या विद्यार्थ्यांना या शिबिरात सहभागी व्हायचे असेल त्या विद्यार्थ्यांनी खालील नंबर वर संपर्क करावा व लवकरात लवकर नाव नोंदणी करून घ्यावी..
अधिक माहिती साठी
आरती गुप्ता:-+918408019798
सर्वेश लवांडे :- +918828530058
श्रेया निकाळजे:-+918424805404
रत्नदीप आठवले:-7715824898