अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने वृक्षांचे पुनर्रोपन
४० फुट उंचीपर्यंतच्या झाडांचे होणार पुनर्रोपन

ठाणे :  ठाणे महापालिकेच्या विकासकामात तसेच रस्तारुंदीकरणामध्ये अडथळा येत असलेल्या झाडांचे अद्ययावत पुनर्रोपन करणारी अत्याधनिक मशीन खरेदी केली असून आता यापुढे या यंत्राच्या माध्यमातून बाधित झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या यंत्राच्या माध्यमातून आज पडले येथे डी.पी रस्त्याच्या कामात अडसर ठरत असलेल्या झाडांचे इतरत्र वृक्षपुनर्रोपण करण्यात येणार आहे. या मशीनच्या माध्यमातून 40 फूटांपर्यतच्या झाडांचे पुनर्रोपण करण्याची क्षमता आहे.
वृक्षपुनर्रोपण मशीनच्या माध्यमातून झाडे एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी लावणे सहज शक्य होणार आहे. 15 ते 20 वर्षे जुनी असलेली झाडे या मशीनच्या माध्यमातून उचलून इतरत्र लावली जात आहे. या मशीनच्या माध्यमातून मुळासकट झाड अलगद उचलले जात असून झाडाला कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही. या मशीनमुळे झाडे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी लावणे ही प्रक्रिया सहज होत असून वेळेची बचत होणार आहे. ठाणे शहरात अनेक ठिकाणी रस्तारुंदीकरणाची कामे सुरू आहेत. या कामामध्ये अडथळा ठरणारी झाडे न तोडता इतरत्र पुनर्रोप्त करता येणे शक्य झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *