शहिदांना आदरांजली आणि हातात तिरंगा घेऊन धावले आजी-आजोबा …
डोंबिवली : शहिदांना आदरांजली आणि हातात तिरंगा झेंडा घेऊन आजी आजोबा धावले… निमित्त होतं मनसेने आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन स्पर्धेत. डोंबिवलीत पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ७२५ जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते त्यांच्यामध्ये ९० वर्षांचे रामचंद्र दादाजी गांगुर्डे आणि ९० वर्षांचे कोरगावकर काका यांचाही विशेष सहभाग होता. यावेळी शहिद जवानांना श्रध्दांजली वाहुन आणि हातात तिरंगा घेऊन आजी-आजोबा धावले. भारतासह सहा देशांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा जिंकून विक्रम करणारे एकनाथ पाटील, जलतरणपटू स्पर्धकांना प्रशिक्षण देणाऱ्या तज्ञ प्रशिक्षक श्रीमती उषा परांजपे आणि थाळीफेकमध्ये नॅशनल गोल्ड मेडल मिळवणारे सुशांत सोनवणे यांनी उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह वाढविला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर आयोजित ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन २०१९ ला रविवारी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मॅरेथॉनचे हे सहावे वर्ष आहे. सहा गटांमधे झालेल्या या मॅरेथॉनमधे पुरुषांचे ३ आणि महिलांचे ३ गट होते. मॅरेथॉनच्या सुरुवातीलाच सकाळी सात वाजता जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक .विजयसिंह पवार आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रामधील बुलढाणा जिल्ह्यातील जे दोन वीर जवान शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबाला मनसे डोंबिवली शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे यांनी प्रत्येकी ५१ हजार रुपयांची मदत जाहीर केली. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष श्री राजेश कदम, जिल्हाध्यक्ष दीपिका ताई पेडणेकर ,जिल्हा सचिव प्रकाश माने ,गटनेते मंदार हळवे ,उपजिल्हाध्यक्ष सुदेश चुडनाईक , जिल्हा सचिव निलेश भोसले , शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे , शहर अध्यक्षा मंदाताई पाटील , मनविसे शहर अध्यक्ष सागर जेधे आदी उपस्थित होते.
गट क्रमांक १.पुरुष ( वय ६0 ते ६५ )
प्रथम क्र. रामचंद्र शिर्के
द्वितीय क्र.नरेंद्र वरवडेकर
तृतीय क्र. बाळू चव्हाण
चतुर्थ क्र.रविकांत बरंगा
पाचवा क्र. सुरेंद्र व्हावळ
गट क्रमांक २ पुरुष ( वय ६५ ते ७९ )
प्रथम क्र हेमकांत धोत्रे
द्वितीय क्र. नाना आसवले
तृतीय क्र उमेश कुलकर्णी
चतुर्थ क्र धाकू बागवे
पाचवा क्र के एन भास्करन
गट क्रमांक ३ पुरुष ( वय ७१ च्या पुढे )
प्रथम क्रमांक रामचंद्र मेस्त्री द्वितीय क्रमांक डाकू परब
तृतीय क्रमांक गोविंद तोंडे
चतुर्थ क्रमांक सुधाकर मोहिते पाचवा क्रमांक शशिकांत मडव
गट क्रमांक ४ महिला( वय ६० ते ६५ )
प्रथम क्र रेशमा साबळे
द्वितीय क्रमांक मनीषा वैद्य
तृतीय क्रमांक स्मिता हेगडे
चतुर्थ क्रमांक शोभा धोटे
पाचवा क्रमांक पुष्पा पटेल
गट क्रमांक ६ (वय ६६ ते ७० )
प्रथम क्रमांक रतन सोमा
द्वितीय क्रमांक पुनम शानबाग
तृतीय क्रमांक आशा दानाईत
चतुर्थ क्रमांक पद्मजा ढवळीकर पाचवा क्रमांक गीता वैद्य
गट क्रमांक ६ महिला वय ७१च्या पुढे
प्रथम क्रमांक विद्या फडके
द्वितीय क्रमांक शोभा राठी
तृतीय क्रमांक रेणुका देधिया
चतुर्थ क्रमांक उर्मिला चंपानेर
पाचवा क्रमांक उषा शेट्टी
****